Ad will apear here
Next
‘इफ्को’तर्फे शेतकऱ्यांसाठी ‘आयमंडी अॅप’
नवी दिल्ली : सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठे खत उत्पादक असलेल्या इफ्कोने शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी ‘इफ्को आयमंडी’ हे अॅप आणि पोर्टल सुरू केले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचे लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचविणे आणि ग्रामीण भारतात डिजिटल क्रांती घडवून आणणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. इफ्कोचे सर्व डिजिटल उपक्रम ‘इफ्को आयमंडी’ मंचावर उपलब्ध असतील.
 
आयमंडी ही इफ्कोची उपकंपनी असलेल्या इफ्को ईबझार लि. ने आयमंडी प्रा.लि. या सिंगापूर स्थित तंत्रज्ञान कंपनीमध्ये केलेली धोरणात्मक गुंतवणूक आहे. ही कंपनी कृषी उद्योग आणि मोबाईल/इंटरनेट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांद्वारे चालविण्यात येते. 

इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस.अवस्थी म्हणाले, ‘भारतभर ऑनलाईन व डिजिटल व्यवहारांच्या उपयोगासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता पसरविण्याची मोहीम राबविल्यानंतर आम्हाला ‘इफ्को आयमंडी’ अॅप सादर करण्यास अतिशय आनंद होत आहे. येथे शेतीशी संबंधित माहिती व उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, कर्जे, विमा, इ. सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आयमंडी साडे पाच कोटी शेतकऱ्यांना सेवा प्रदान करेल.’
 
आयमंडी प्रा.लि.चे संस्थापक व्ही. के. अगरवाल म्हणाले, ‘या भारतीय सहकारी डिजिटल मंचाच्या योगे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून आणणे शक्य होईल. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल. त्यामुळे, इफ्कोची पंचावन्न हजारहून जास्त विक्री केंद्रे, ३६ हजार सहकारी संस्था, 30 हजारहून अधिक गोदामे आणि सोळा हजार पिन कोड्सवरील २५ कोटी ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोचू शकण्याच्या सोयीचा उपयोग करून, आयमंडी हा भारतातील सर्वांत मोठे ग्रामीण सामाजिक ई-कॉमर्स मंच ठरेल. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस फोन्ससाठी प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. वापरकर्ते आपापल्या आवडीनुसार विविध मंचांमध्ये सामील होऊ शकतात; ते तज्ञांशी बोलून आपल्या अडचणींबद्दल सल्ला घेऊ शकतात. एवढेच नव्हे, तर ते आपल्या यशोगाथाही इतरांपर्यंत पोचवू शकतात. लवकरच शेतकरी आपले उत्पादन सर्वोत्तम किमतीत ऑनलाईनही विकू शकतील. आयमंडीद्वारे कर्जे, विमा, इ. सारख्या विविध वित्तीय सेवांचाही लाभ घेता येईल. हे अॅप हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त आणखी दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZSFBQ
Similar Posts
विदर्भातील शेतकऱ्यांची थेऊरला भेट थेऊर : येथील राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित व अत्याधुनिक शेतीपूरक रोपांची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांनी भेट देऊन उत्पादनाची माहित घेतली.
डॉ. वारीद अल्ताफ यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे : दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे (एनबीई) नवी दिल्ली १९वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील डॉ. वारीद अल्ताफ यांचा समावेश होता.
‘सीए सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रतिनिधी’ पुणे : ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य
मोबिक्विक ॲपवर तत्काळ कर्ज सेवा उपलब्ध नवी दिल्ली : मोबिक्विकने बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारी करत, आपल्या अॅपवर किमान पाच हजार रुपयांचे कर्ज त्वरित उपलब्ध करण्याची सेवा दाखल केली आहे. मोबिक्विकचे हे अशाप्रकारचे पहिले पत वितरण उत्पादन असून, देशामधील लाखो नवीन कर्ज (एनटीसी) ग्राहक; तसेच लहान व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language